अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी माध्यम प्रमाणीकरण व नियंत्रण समिती स्थापन.

Dec 24, 2025 - 14:08
 0  5
अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी माध्यम प्रमाणीकरण व नियंत्रण समिती स्थापन.

अहिल्यानगर :  अहिल्यानगर   महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष व आचारसंहितेनुसार पार पाडण्यासाठी महानगरपालिकास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व नियंत्रण समिती (एमसीएमसी) स्थापन करण्यात आली आहे. 

              जिल्हा निवडणूक प्रशासनाच्या आदेशानुसार ही समिती कार्यरत राहणार आहे.निवडणूक प्रचारादरम्यान प्रिंट, इलेक्ट्रॉनिक तसेच सोशल मीडियावर प्रसिद्ध होणाऱ्या राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण करणे ही समितीची प्रमुख जबाबदारी असेल. कोणताही उमेदवार किंवा राजकीय पक्ष समितीची परवानगी न घेता जाहिरात प्रसिद्ध करू शकणार नाही.पेड न्यूज, दिशाभूल करणारी माहिती, अफवा तसेच आचारसंहितेचा भंग करणाऱ्या जाहिरातींवर समिती विशेष लक्ष ठेवणार आहे. 

             नियमभंग आढळल्यास संबंधितांवर निवडणूक कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे डिजिटल प्रचारावरही समितीचे बारकाईने निरीक्षण राहणार आहे. नागरिकांनी तसेच माध्यम प्रतिनिधींनी निवडणूक नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन निवडणूक प्रशासनाकडून करण्यात आले आहे.या समितीमुळे अहिल्यानगर महानगरपालिका निवडणूक प्रक्रिया अधिक शिस्तबद्ध, पारदर्शक व विश्वासार्ह होण्यास मदत होणार आहे

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow