4 अहिल्यानगर महापालिका निवडणूक : जागावाटपावरून महायुतीत तणाव, फूट पडणार का?

Dec 24, 2025 - 14:16
 0  4
4 अहिल्यानगर महापालिका निवडणूक : जागावाटपावरून महायुतीत तणाव, फूट पडणार का?

अहिल्यानगर : अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. जागावाटपावर कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याची ठाम भूमिका शिंदेसेनेने घेतली असून, भाजपही आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे चित्र आहे.त्यामुळे महायुतीत फूट पडणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

                   शिंदेसेनेचे नेते आणि कार्यकर्ते विद्यमान ताकद आणि संघटनात्मक बळ लक्षात घेता अधिक जागांची मागणी करत आहेत. दुसरीकडे भाजपकडूनही मोठ्या प्रमाणात जागांवर दावा करण्यात येत असून, राष्ट्रवादी काँग्रेसही आपली भूमिका आक्रमकपणे मांडत आहे.महापालिका निवडणूक जवळ येत असताना जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही.

                  स्थानिक पातळीवर अनेक बैठका झाल्या तरीही तोडगा न निघाल्याने महायुतीतील समन्वयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.जर लवकरच सामंजस्य झाले नाही, तर काही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेऊ शकतात, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याचा थेट परिणाम अहिल्यानगरमहापालिकेच्या निवडणूक समीकरणांवर होण्याची शक्यता आहे.आगामी काही दिवसांत वरिष्ठ पातळीवर चर्चा होणार असून, त्यानंतरच महायुतीचे भवितव्य स्पष्ट होणार आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow