अहिल्यानगर महानगरपालिका निवडणूक ठरणार लक्षवेधी..
अहिल्यानगर : राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचा बिगुल अखेर वाजला असून, त्यात अहिल्यानगर महानगरपालिका निवडणूक 2025 विशेष चर्चेत आहे. सन 2023 मध्ये अहिल्यानगर महानगरपालिकेचा कार्यकाळ संपल्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून येथे प्रशासक राज कार्यरत आहे.
त्यामुळे ही निवडणूक नागरिकांसह राजकीय पक्षांसाठीही अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.राज्यातील बहुतांश महानगरपालिकांमध्ये सध्या प्रशासक कारभार असून, लवकरच निवडणूक प्रक्रिया सुरू होण्याचे संकेत मिळाले आहेत. यामुळे इच्छुक उमेदवारांची हालचाल वाढली असून, राजकीय वातावरण तापू लागले आहे.
अहिल्यानगरमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती या दोन प्रमुख आघाड्यांमध्ये प्रत्येकी तीन-तीन पक्ष सहभागी असल्याने ही निवडणूक अधिकच रंगतदार होण्याची शक्यता आहे. स्थानिक प्रश्न, विकासकामे, प्रशासक कारभारावरील नाराजी आणि पक्षांतर्गत समीकरणे यावर निवडणूक लढत होणार आहे.
प्रशासक काळानंतर लोकप्रतिनिधींची निवड होणार असल्याने नागरिकांमध्येही मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. येत्या काळात उमेदवार जाहीरनामे, प्रचारसभा आणि राजकीय आरोप-प्रत्यारोप यामुळे अहिल्यानगर महानगरपालिका निवडणूक चांगलीच गाजण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
What's Your Reaction?